पोलिसावर हल्ला करून फरार झालेले २ आरोपी ताब्यात.


सातारा : धर्मेंद्र वर्पे

सातारा : शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाढते गुन्हेगारीच्या अनुषंगाने आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा येथे ऑपरेशन राबवून माहितगार गुन्हेगार व त्यांची राहते घरी चेक करण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या होत्या.

दरम्यान तेथील 29 गुन्हेगार व त्यांची घरे चेक करत असताना दोन संशयित इसम हे मतदार कॉलनी झोपडपट्टी सातारा येथून पळून जात असताना त्यांना पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करून पकडले. सदरचे संशयित इसम हे सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये त्यांच्या नावे गुन्हे नोंद असल्याबाबत समजले. त्यांनी सातारा शहरातील एसटी स्टँड चौकीचे पोलीस अंमलदारास मारहानण करून फरार झाल्याचे १) रोहन विलास थोरात वय २० वर्ष रा. मतकर कॉलनी २) प्रथमेश सुनील साळुंखे वय २० वर्ष रा. आव्हाडवाडी सातारा यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे विना नंबर प्लेटच्या १५ मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यावर एम व्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत यादव पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अमित पाटील सह सातारा येथील तीन आर.सी. पी.पथक मधील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!