अनुगामी लोकराज्य महा अभियान (अनुलोम) संस्थेतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी पासून जयंती पर्यंत साजरी केल्या जाणाऱ्या समरसता पंधरवड्यामध्ये काल दि.२९जुलै२०२४रोजी उंबरे ता.भोर जिल्हा पुणे या गावामध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान( अनुलोम ) या संस्थेच्या माध्यमातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंतीचे औचित्य साधून साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ भोरडे यांच्या सहकार्याने २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची माहिती व अनुलोमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती अनुलोमचे भोरचे प्रमुख एड. मंगेश चंद्रशेखर अंबुले ( गुरव ) यांनी केली.प्रसंगी आयोजक आनंद खुडे व सामाजिक कार्यकर्ते आदित्य खुडे,संजय खुडे,प्रतिक खुडे व पोलीस पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.
सागर खुडे


