खंडाळा- माजी विध्यार्थी व शिक्षक मेळावा उत्सहात संप्पन्न.
पुण्यभूमी न्यूजसाठी- धर्मेद्र वर्पे
खंडाळा विभाग शिक्षण समिती द्वारा संचालित पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा सन २००८-२००९ साली १० वी झालेले सर्व माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षक यांचा स्नेह मेळावा शनिवार १५ फेब्रुवारी रोजी ARC रिसॉर्ट वडगाव लेक शिरवळ याठिकाणी विद्यार्थी व जेष्ठ शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत अतिशय उत्सहात संप्पन्न झाला.
जवळपास १५,१६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे सर्वजण एकत्र आले होते.शिक्षकांनी देखील १५ वर्षानंतर या सर्वांनी एकत्र येत आयोजित या स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केल्यामुळे सर्वांनाच अतिशय आनंद झाला.जवळ पास १६ वर्षानंतर हे सर्वजण एकत्र आले होते.यावेळी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली.सद्या कोण कोणत्या क्षेत्रात योगदान देत कर्तव्य बजावत आहे हे सर्वांनी सांगितले.अनेकांनी जुन्या आठवणी सांगत आपली मनं मोकळी केली.भूतकाळतील आठवणीना उजाळा देण्यात आला.शिक्षकांना देखील आपल्या विध्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश पाहून आनंद झाल्याचे सांगितले.तसेच यावेळी न येऊ शकलेले इतर विध्यार्थी यांची देखील सर्वांनी विचारपूस करून असेच एकत्र येत विविध उपक्रम राबवून अडचणीत एकमेकांना साहाय्य करत रहा असे यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी सांगितले.
योगायोगाने यांचदिवशी वर्गशिक्षक शिरावळे सर यांचा वाढदिवस होता.शिरावळे सर व शिरावळे मॅडम यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस या माजी विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला. इतर शिक्षक व सर्व विध्यार्थी यांनी यावेळी शिरावळे सरांना शुभेच्छा दिल्या.
वर्गशिक्षक दत्तात्रय शिरावळे सर,शिरावळे मॅडम,जालिंदर धायगुडे सर,पिसाळ सर,इंगवले सर,पठाण सर.
उपस्थित माजी विद्यार्थी
शुभम गायकवाड,गणेश जाधव,गणेश खोमणे,विशाल पाटील,महेश पाटील,दत्तात्रय भोसले,अभिजित सुतार,शुभम भोसले,सुदर्शन भोसले,अभिषेक शिरावळे,सागर गुरव,विपुल भोसले,धर्मेद्र वर्पे,संतोष जगताप,
मोनिका शेवाळे,स्नेहल भोसले,अश्विनी भणगे,निलांबरी,निशिगंधा शिरावळे,धनश्री जाधव,जयश्री भोसले,प्रियांका सटाले, दिपाली,शितल भोसले,रेश्मा भोसले.


