लोणंद पोलीसांकडून डी.पी. चोरी व मोटार सायकल चोरटे जेरबंद
फलटण चौफेर दि १ मार्च २०२५
लोणंद पोलीस स्टेशन हददीत डी.पी. व मोटार सायकल चोरी करणाऱ्या सरायतांना लोणंद पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ३ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्यांमध्ये संशयित संज्या नमण्या पवार वय ५२ वर्षे, आदित्य संज्या पवार वय २० वर्षे दोन्ही रा. झणझझे सासवड माळीबंद ता. फलटण जि. सातारा अशी नाव आहेत याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी
सपोनि सुशिल भोसले यांनी डी. बी. पथक व पोलीस अंमलदार यांचेसह हददीत कोंबींग ऑपरेशन राबवली होती व डी.पी. चोरीतील आरोपी पकडण्याचा प्रयत्न चालु होता. त्यानंतर बातमीदार यांचेकडुन मिळाले माहीतीनुसार डी.पी. चोरी ही संशय त्यांनी केले असून ते त्यांच्या घरी असल्याची माहीती मिळाल्याने त्यांना सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे प्राथमीक तपास केला असता संज्या पवार, आदित्य पवार तसेच त्यांचे साथीदार यांनी लोणंद पोलीस स्टेशन हददीमधील डी.पी. पाडुन आतील तांब्याची तार चोरली आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर संज्या पवार याने त्याचे वाटणीला आलेली तांब्याची तार तसेच चोरी केलेल्या एकुण ४ मोटार सायकली असा एकुण ३ लाख ११ हजार ३०० रुपयांचा मुददेमाल काढुन दिला असल्याने तो जप्त करण्यात आला आहे. संज्या पवार व आदित्य पवार यांनी सासवड, हिंगणगाव, तरडगाव, पिंपरे बु. टाकुबाईचीवाडी, निंबोडी, काळज, रावडी इत्यादी गावातील डी.पी. चोरल्याबाबत कबुली दिली आहे. तसेच त्यांनी व त्यांचे साथीदार यांनी लोणंद तसेच फलटण हददीतील भरपुर डी.पी. चोरी केले असलेबाबत कबुली दिली आहे.
सदरची कारवाई मा.श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि विशाल कदम, देवेंद्र पाडवी, दिलीप येळे, विष्णु धुमाळ, नितीन भोसले, रत्नसिंह सोनवलकर, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, केतन लाळगे, विठठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीष दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे हार्दीक अभिनंदन केले