राज्यांतील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अखेर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त सापडला,
संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्रतिनिधी.
गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले होते. अशातच आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यांमध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून पोलीस प्रशासनामध्ये मोठे फेरबदल केले जात आहेत. बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्याचारांच्या वाढत्या घटना तसेच आता पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारांच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता राज्यांच्या पोलिस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले असून .बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल झालेल्या अधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे नावे आणि पदस्थापना.१) यशस्वी यादव- अप्पर पोलीस महासंचालक सायबर महाराष्ट्र )२) अशोक मोराळे- विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग)३) निखिल गुप्ता- अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)४)के.एम मल्लिकार्जुन प्रसन्ना-अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) ५) राजीव जैन-विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) ६) मनोज कुमार शर्मा-विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था) ७) आर. बी डहाळे-विशेष पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अभिलेख केंद्र) ८) छेरिंग दोरजे-अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) ९) सुरेश मेखला-अप्पर पोलीस महासंचालक (आर्थिंक गुन्हे) १०) सुहास वारके- अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सेवासुधार)११) आभि त्रिमुखे- अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई )१२) अश्वती दोरजे-अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग)१३) श्रेणिक लोंढा-अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव बुलढाणा)


