कराड चिपळूण रस्त्याची खड्ड्यामुळे झालेले चाळण पाटण कोयना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संगमनेर धक्का येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी: शंकर माने
दि.६ :ऑगस्ट पाटण कराड-चिपळूण रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण, मतदारसंघातील इतर नित्कृष्ट रस्त्यांची कामे, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहनांची होत असलेली वाताहत, यामुळे वाढलेले अपघात या समस्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज संगमनगर धक्का येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गणेशोत्सवाच्या अगोदर जर सर्व रस्ते पुर्णपणे दुरुस्त झाले नाहीत तर हे रस्ते नांगराने उकरुन टाकण्यात येईल असं सांगितलं. यावेळी आंदोलकांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रस्त्यां
च्या कामाची सुरुवात तातडीने करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मा.राजाभाऊ शेलार, पं. स. सदस्य मा.बबन कांबळे, माजी पं.स.सदस्य मा.बाळासाहेब कदम, डेप्युटी इंजिनिअर मा. पुजा परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.संदिप शितोळे, मा. रावसाहेब जंगम, पंकज गुरव, राजेश पवार, सत्यजित शेलार, राम कदम, मामा मोरे, दाजी पाटील, वसंत कदम, भरत कदम, अनुप मोहिते, संजय कांबळे, सुरेश लोखंडे, सपंत पवार, आकाश पवार, स्वप्निल जाधव, रवींद्र टोळी, संदिप लोहार, विश्वजित पाटणकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



