सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची गावगाड्यांच्या मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट.
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) चे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन गावगाड्यांच्या मागण्यांचे निवेदन देत आपण ही आमच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती केली तसेच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची मोदीबाग पुणे या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या व्यथा तसेच मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शरदचंद्र पवार साहेब यांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करून तुमची मुख्यमंत्र्या सोबत बैठक लावू मी स्वतः उपस्थित राहील असा शब्द दिला.
दिल्लीत अधिवेशन सुरु आहे ते संपले कि तुम्हाला निरोप देतो तुम्ही प्रमुख पदाधिकारी घेऊन मुंबईला यावे लागेल यावेळी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत अनेक जिल्ह्यातून पदाधिकारी तसेच राज्य पदाधिकारी उपस्थित होते – शत्रुघ्न धनवडे सातारा जिल्हा सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र मो. 88579 05673


