डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा 25 मे रोजी पुणे येथे राज्यस्तरीय मेळावा :- राजा माने
सातारा प्रतिनिधी: सुनिल धनावडे
सातारा : – देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी पुणे येथे घेण्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते.राज्य सचिव महेश कुगावकर, सह सचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे,अमोल पाटील हे उपस्थित होते. सतीश सावंत, विकास भोसले, इक्बाल शेख,तेजस राऊत,मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे, अजिंक्य स्वामी, संजय भैरे,प्रशांत कटारे, राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले. महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला-मुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात येणार आहे .


