गणेश बिरादार यांनी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
संपादक : संभाजी पुरीगोसावी
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 चे समादेशक म्हणून कार्यरत असणारे गणेश सोनाजीराव बिरादार यांची बारामती येथील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची धाराशिव येथे पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाल्यापासून बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पद हे रिक्त होते, आणि याच पदावर आता डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे गणेश बिरादार यांनी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे, गणेश बिरादार हे इचलकरंजीचे पोलीस उप अधीक्षक असताना 2020 मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक देण्यात आले होते, तेलनाडे गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाईन छाप पाडली होती, त्याचबरोबर फाळकूटदादा, घरफोड्यांना जेरबंद करणे, अशा धाडसी कारवाया केल्या होत्या, इचलकरंजीत असताना बंधूंवर केलेली मोक्का अंतर्गत कारवाई ही राज्यभर गाजली होती, तसेच कोरोनांच्या काळातही थेट रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रबोधनाची मोहीम राबवली होती, गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात नक्षलग्रस्त लोकांचे प्रबोधन करून परिवर्तन करण्यात यशस्वी ठरले होते, यासह या भागात सलग दोन वर्षे उत्कृंष्ट सेवा दिली, त्यांच्या बदलीचा स्वतंत्रपणे आदेश जारी करुन बारामती अप्पर पोलीस अधीक्षक पदावर मागील काही दिवसांपूर्वी नियुक्ती देण्यात आली होती, नूतन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

 
			

 
					 
							 
							