पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा आदेश.
संपादक : संभाजी पुरीगोसावी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील मागील काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर आता पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी रात्री उशिरा काढले आहेत. यामध्ये मंचर खेड शिरूर आळेफाटा पौड बारामती शहर बारामती तालुका शिरूर माळेगांव सुपा या पोलीस ठाण्यात आता नव्या कारभाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पो.नि. श्रीकांत कुंकाळ (नव्याने हजर ) मंचर पोलीस ठाणे) पो.नि. विलास नाळे (नव्याने हजर ) बारामती शहर पोलीस ठाणे) पो.नि. विश्वास जाधव ( नव्याने हजर) बारामती तालुका पोलीस ठाणे) पो.नि. संदेश केंजळे (नव्याने हजर) शिरूर पोलीस ठाणे) पो.नि. राजेश रामघरे (नव्याने हजर) आर्थिंक गुन्हे शाखा) पो.नि. संतोष गिरीगोसावी ( जिल्हा वाहतूक शाखा ते पौड पोलीस ठाणे ) पो.नि. संतोष घोळवे ( बारामती शहर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष ) पो.नि. गोरख गायकवाड (बारामती तालुका पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष ) पो.नि. ज्योतीराम गुंजवटे ( शिरूर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष ) पो.नि. अरुण फुगे (मंचर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष ) पो.नि. संतोष जाधव ( नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा ) पो.नि. दिनेश तायडे (पोलीस उप मुख्यालय बारामती ते आळेफाटा पोलीस ठाणे) पो.नि. प्रभाकर मोरे (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते खेड पोलीस ठाणे ) पो.नि. अभिजीत देशमुख ( जिल्हा विशेष शाखा ते परकीय नागरिक नोंदणी कक्ष ) स.पो.नि. राजकुमार डुणगे ( इंदापूर पोलीस ठाणे ते वालचंदनगर पोलीस ठाणे) स.पो.नि. सचिन लोखंडे (आर्थिक गुन्हे शाखा ते माळेगांव पोलीस ठाणे) स.पो.नि. मनोजकुमार नवसरे (रांजणगांव पोलीस ठाणे ते सुपा पोलीस ठाणे ) सदर बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ हजर राहून तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

 
			

 
					 
							 
							