नवीमुंबई स्थित मेढा ,केळघर रहिवाशांची मिटींग संपन्न ;बोंडारवाडी धरण कृती समितीच्या स्वाक्षरी मोहिमेस प्रचंड प्रतिसाद


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

मुंबई : दि. ६ ऑक्टोबर २४ रोजी धरण कृती समितीची स्वाक्षरी मोहीम आणि मिटिंग कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आली.

सदरच्या नियोजित मिटिंग साठी २५० हुन जास्त मुंबई स्थित ग्रामस्थ उपस्थित होते.

मीटिंग च्या सुरुवातीला कृती समिती निमंत्रक विनोद शिंगटे यांनी स्वागत केले. त्या नंतर वैभव ओंबळे यांनी प्रस्तावना देत धरणाची सध्याची स्तिथी आणि आधी पुनर्वसन मगच धरण या शासनाच्या आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या निर्णयाला कृती समिती सहमत आहे असे सांगितले. आदरनीय आमदार श्री. शिवेंद्र सिंह राजे भोसले हे देखील सातारा पुणे आणि नाशिक जलसिंचन विभागाशी सातत्याने संपर्कात असून ते धरणासाठी पाठपुरावा करत आहेत हे सांगण्यात आले. भुतेघर, बोंडारवाडी आणि वाहिटे या गावांसाठी कृती समिती शासनाशी पाठपुरावा करेल या वर देखील भर देण्यात आला. तसेच श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर साहेब यांचा पुनर्वसनवरील अभ्यास असून ते आपल्याला योग्य दिशा दाखवतील असे सांगण्यात आले.

मीटिंग मध्ये मोहन देसाई, स्वप्नील धनावडे करंजे, राजेंद्र धनावडे (मामूर्डी ),आनंदा ओंबळे, बापू पार्टे , नवनाथ धनावडे, एकनाथ धनावडे ( गुरुजी ), साईनाथ कदम यांनी मार्गदर्शन केले.

ADVERTISEMENT

सदरच्या नियोजित कार्यक्रमाला बाबाराजे प्रतिष्ठान, JPL टीम, मैत्री ग्रुप जावळी ,शिवक्रांती हिंदवी सेना, या संघटनाची विशेष उपस्थिती होती.

बापू पार्टे यांनी जास्तीत जास्त युवा संघटन तयार करू असे सांगितले.नवनाथ धनावडे यांनी त्यांच्या करंजे या गावातून युवा तरुणाचा सक्रिय सहभाग असेल असे सांगितले.

कार्यक्रमासाठी राजेंद्र शेठ धनावडे, नारायण शेठ सुर्वे, सीताराम सुर्वे, रामचंद्र सुर्वे, ज्ञानदेव दळवी, अशोक पार्टे, मोहन देसाई, दीपक मोरे, विशाल देसाई , संतोष भोसले, अर्जुन कदम, शांताराम धनावडे, ध्यानेश्वर सपकाळ, अरविंद सपकाळ, दत्ता शेलार, तुकाराम धनावडे,सिद्धार्थ सकपाळ (फौजी) , राजेंद्र ओंबळे यांची उपस्थिती होती .

महिला गटामध्ये राणी पाथर्डे, कांचन धनावडे, सौ. मोहन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा स्वाक्ष्मीरीचा उपक्रम यशस्वी करण्या साठी जितेंद्र कासुर्डे, जनार्दन मोरे, सागर सुर्वे, विनायक महेंद्र कासुर्डे, लहुराज सुर्वे, स्वप्नील धनावडे, सचिन ओंबळे, विलास भनगे, संतोष शिंगटे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थितांचे एकनाथ धनावडे (गुरुजी ) यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!