सर्वसामान्य जनता म्हणते, घोडेगांव पोलीस ठाण्याचे कारभारी लयं भारी, कर्तव्यदक्ष सहायक पोलिस किरण भालेकर यांचे जनतेतून कौतुक प्रतिनिधी.


 

संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

आंबेगांव तालुक्यांतील घोडेगांव पोलीस ठाणेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक प्रभारी अधिकाऱ्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली, यामध्ये प्रदीप पवार जीवन माने अशा अनेक प्रभारी अधिकारी यांनी घोडेगांव पोलीस ठाणेत जनतेशी जनसंपर्क वाढवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, दिनांक 14 जुलै 2023 तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशावरून सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी घोडेगांव पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून आगामी लोकसभा निवडणूकांची लोकसभा निवडणुकीची जबाबदारी तसेच पुढे असणाऱ्या आगामी सण उत्सव या काळातही घोडेगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमधील आपल्या पोलिस ठाणेकडील कर्मचाऱ्यांंसमवेत तसेच जनतेशी संपर्क वाढवून कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रयत्नशील आहेत, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस ठाणेच्या परिसरांमध्ये अवैद्य धंद्यांना देखील त्यांनी थारा दिला नाही, तसेच प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यास त्यांनी प्रथम प्रधान्य दिले, त्याचबरोबर पोलीस ठाणेच्या परिसरांतील पोलीस पाटलांसह सर्व जनतेला पोलीस ठाणेत बोलवून आपली ओळख करून जनसंपर्क वाढवून सध्या सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर हे जनतेच्याच नव्हे तर अगदी सर्व सामान्यांच्या मनातही त्यांचे आज नाव कायम आहे, घोडेगांव पोलीस ठाणेच्या सर्वसामान्यांच्या कायम संपर्कात आहेत. पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून अवैध धंदे चोऱ्या माऱ्या वाहन चोऱ्या घरफोड्या अशा विविध गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे, मागील काही दिवसांपूर्वीच घोडेगांव परिसरांत एका शालेय महाविद्यार्थींचा विनयभंग करून फरार झालेल्या आरोपी बाबतीत सखोल तपास,तांत्रिक माहिंतीच्या द्वारे अगदी शिंताफीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व सर्वसामान्य नागरिकांकडून अभिनंदन चा वर्षा होत आहे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर हे प्रथम सर्वसामान्य न्याय देणारे आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जातात. त्यांनी पुणे ग्रामीण विभागातील विविध पोलीस ठाणेत उत्कृंष्ट सेवा दिली आहे, नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत, त्यामुळेच त्यांच्या कामगिरीबद्दल सध्या घोडेगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमधील सर्वसामान्य जनता म्हणते … पोलीस ठाण्याचे कारभारी लयं भारी अशा प्रतिक्रिया दिसून येत आहेत,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!