वंचित, कष्टकरी, गोरगरीब बांधवासोबत पुण्यातील गणेश मंडळांनी केली साजरी दिवाळी साजरी.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
अतिदुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी कातकरी व आदिवासी वस्तीवरील कुटुंबांसोबत एक सामाजाचे आपण काहीतरी देणे लागतो अशी मानुसकी जपणारी दिवाळी साजरा करण्याचा अभिनव नाविन्यपूर्ण विधायक उपक्रम आज २९ऑक्टोंबर रोजी पुण्यातील निवडक गणेश मंडळांनी राबविला.
येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ,गुरुवार पेठ येथील वीर शिवराज मंडळ व सहकार नगर येथील संजीवनी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भोर तालुक्यातील किकवी व कासूर्डी येथील कातकरी आदिवासी वस्ती(पाडा)वर एकूण ७५ कुटुंबांना लाडू,चिवडा,फरसाण,करंजी,चकली अशा नाना दिवाळीच्या फराळा सह आकाश दिवे, पणत्या, फटाके व कपडे भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा या सद्भावना उराशी बाळगत त्या वंचितांना देखील साजरा करता यावा, म्हणून पुण्यातील गणेश मंडळांनी हा अभिनव उपक्रम राबविला. त्यासोबतच मुलांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या असा अनमोल संदेश देखील त्यांनी उपस्थितांना देत दिवाळीच्या शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.
प्रसंगीच्या संजीवनी मित्र मंडळाचे प्रसाद दिवटे, निलेश खोंदापुरे , नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, अन्वेश, सार्थक आणि वीर, शिवराज मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर हे उपस्थित होते.
पुण्यातील गणेश मंडळांनी अचानक दिवाळीनिमित्त दिलेल्या या आनंददायी भेटीमुळे वस्तीवरील लहान मुले त्यांचे पालक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला आनंदमयी होता.


