नवऱ्यापासून मूल होत नाही तर माझ्याशी संबंध ठेव:- सुनेशी वक्तृत्व माजी सहायक पोलीस आयुक्तांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,


माधवी गिरी गोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने आपल्या नवविवाहित सुनेकडे बळजबरीने करून तिला शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र पीडितेने कशीबशी सुटका करून सहकारनगर पोलीस ठाणे गाठले कधीकाळी रक्षक म्हणून वावरणाऱ्या माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताचा लपट चेहरा चांगलाच समोर आला आहे. पीडिता ही 30 वर्षाची असून तिचा महिन्याभरांपूर्वी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाशी विवाह झाला होता. मात्र आपला मुलगा पिता बनण्यास सक्षम नाही हे त्यांच्या कुटुंबाला माहीत होतं याची माहिती लपवून पीडितेशी लग्न लावून दिले. आणि लग्नानंतर आरोपी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांने सुनेच्या खोलीमध्ये जावुन सगळी परिस्थिती तिला सांगून माझ्या मुलाकडूंन तुला अपत्य होणार नाही, तुला माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील, अशी ऑफर दिली. हे ऐकून पीडितेच्या पायाखालची जमीनच हादरली. तिने कसेबसे स्वतःला सावरले, आणि या ऑफरला नकार देवुन कौशल्याने आपली सुटका करून अखेर सहकारनगर पोलीस ठाणे गाठले, पोलिसांना सर्व हकीगत सांगितली हे ऐकून पोलिसही अवाकू झाले, माजी सहायक पोलीस आयुक्तांचा कारनामा सध्या पुण्यात चांगलाच चर्चेत आला आहे. आता सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त सहाय्यक आयुक्तांसह त्याची पत्नी आणि पीडितेच्या पती विरोधांत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!