भुईज येथे दोन गटात हाणामारी, भुईज पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील भुईज येथील पुलाजवळ दि. १७ रोजी रात्री ८.३० वाजता दोन गटात हाणामारीची घटना घडली. यावरुन परस्परविरोधात ११ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात दि. १८ रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केलेला आहे. गणेश धनंजय शिंदे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज भोसले, पवन भोसले, ओम भोसले, रुपेश भोसले, योगेश भोसले, मयूर भोसले यांनी दुचाकीवरुन येवून गणेश शिंदे यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर सुरज तानाजी भोसले याने दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश शिंदे, धनंजय खरे, दिनेश शिंदे, कुणाल खरे, प्रथमेश भोसले यांनी तू कशाला मयूरच्या आणि पवनच्या भांडणात पडतो असे म्हणत मारहाण केली. यावरुन गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास भुईज पोलीस करत आहेत.


