दारू पिऊन धिंगाणा घातल्या प्रकरणी दोघांवर कारवाई
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
दारू पिऊन धिंगाणा घातल्या प्रकरणी दोघांवर वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.16 रोजी रोजी 15.05 वा. चे सुमारास धनंजय परमिट रुम येथे यशवंतनगर येथे किरण नामदेव महांगडे रा. मालकमपेठ पसरणी, सुरज रमेश शिर्के, रा. मालकमपेठ, पसरणी, यांनी दारूचे सेवन करून येवुन आपआपसांत मारामारी व आरडा ओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला असल्याने व वैद्यकीय अहवालात ते दारुच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द वाई पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आले आहे.


