खूनाच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद.


 

सातारा : पुसेगाव पोलीस ठाणेच्या हद्यीतील दरूज या गावी पत्नी व मुलाला पाठवत नसलेच्या कारणावरून नातजावयाने चिड्डुन जावुन सासरचे घरातील लोकांशी भांडण करून आजेसासू शालन शंकर आवळे रा. दरूज ता. खटाव जि. सातारा हिचेकडे रागात बघुन “जे होतय ते ह्या म्हातारी मुळेच होतय, हिला जिवंत ठेवत नाही” असे म्हणून नातजावयाने त्याचे ताब्यातील इंडिका कंपनीची गाडी क्रमांक एस एच ४७-एन १९३३ ही चालू करून गाडी पाठीमागे घेवुन पुन्हा जोरात पुढे घेवुन आजेसासूच्या अंगावर चारचाकी गाडी घालून आजेसासूस गंभीर जखमी करून ठार केलेची घटना घडली होती. त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणेस दिनांक १३.०५.२०२४ रोजी खूनाचा गुन्हा दाखल झालेला होता. घटना घडलेनंतर सदर गुन्हयातील आरोपी सागर संपत उमापे मुळ रा. राजाचे कुर्ले ता खटाव जि. सातारा सध्या रा. गंगापुर शिवनगर आनंदकॉलनी नाशिक ता. जि. नाशिक हा फरारी झाला होता.

 

सपोनि आशिष कांबळे यांनी गुन्हा दाखल होताच घडले प्रकाराबाबत मा. पोलीस अधीक्षक

ADVERTISEMENT

 

समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव श्रीमती सोनाली कदम यांना घटनेची माहीती दिली. वरीष्ठांनी दिलेले मार्गदर्शन व सुचनानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली असता आरोपी सागर उमापे हा कुटुंबासह दिल्ली, हरीयाणा या परीसरात असलेची माहीती मिळालेने त्याचे तपासकामी एक पथक दिल्ली येथे रवाना केले होते मात्र पोलीसांची चाहून लागलेने आरोपी दिल्ली येथून नाशिक मार्गे सांगलीकडे जात असलेचे तांत्रिक माहीतीतून पुढे येत होते. त्यानुसार दुस-या तपासपथकाने पुणे सातारा कराड महामार्गावर सापळा रचून आरोपी सागर संपत उमापे वय २४ वर्षे मुळ रा. राजाचे कुर्ले ता खटाव जि. सातारा सध्या रा. गंगापुर शिवनगर आनंदकॉलनी नाशिक ता. जि. नाशिक यास कराड येथील एस.टी. स्टॅन्ड येथून ताब्यात घेवन सदर गुन्हयाचे कामी दिनांक १८.०५.२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि आशिष कांबळे हे करीत आहेत.

 

समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती सोनाली कदम, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, सफौ. सुधाकर भोसले, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अब्दागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, तुषार बाबर पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगदाळे, अविनाश घाडगे, अमृता चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणणेसाठी मदत केली आहे. त्याबाबत सर्व अधिकारी, अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!