सातारा ते पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना कापूरहोळ येथे भरधाव वाहनाने ठोकरल्याने मृत्यू.
पुण्यभूमी महाराष्ट्र
मंगेश पवार
कापूरहोळ : भरधाव चारचाकी मारुती इको वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडताना पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
सातारा ते पुणे महामार्गावर कापुरहोळ चौकात शनिवार दि.१८ रात्री ८:३० सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी वाहन चालक विरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरहोळ ता. भोर जि.पुणे चौकामध्ये
विलास विठ्ठल गाडे वय ४८ वर्ष रा कापूरहोळ ता. भोर जि. पुणे हे रस्ता ओलांडताना सातारा बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या ड्राइवर शिवाजी दत्तू कडोलकर वय ४५ वर्ष रा तुळजाभवानी मंदिर महाराज नगर जाधव वाडी चिखली ता. हवेली जि. पुणे यांनी त्यांच्या मारुती ईको गाडी नं. एम एच १४ डी टी २६५२ या गाडीने रस्ता ओलांडनाऱ्या विलास गाडे यांना समोरून ठोस मारली. त्यात गाडे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
म्हणून इको चालकाविरुद्ध ओंकार गाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मयूर निंबाळकर करीत आहेत


