अथर्व संतोष गोरे 19 वर्षाखालील मुले गटात ग्रीक्रो रोमन कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात पहिला
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
खंडाळा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा व परमपूज्य बापूजी साळुंखे विद्यालय असवली यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन २०२४.
शुक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४ १४/१७/१९ वर्षा खालील मुले फ्री स्टाईल
शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ १४/१७/१९ वर्षा खालील मुली
१७ व १९ वर्षा खालील मुले ग्रीको रोमन स्टाईल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा तालुका जावली या विद्यालयातील विद्यार्थी अथर्व संतोष गोरे याने १९ वर्ष वयोगटात ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला श्री वेण्णा विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा जावली यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
अथर्व गोरे विद्यार्थीचे , प्रार्चाय पाटील बी.बी. व क्रीडा मार्गदर्शक प्रा.विक्रम उंबरकर यांचे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे व विभागस्तरीय स्पर्धेसाठी मा.जिल्हा क्रीडा अधिकारी , मा.गटशिक्षणाधिकारी, मा शिक्षण विस्तार अधिकारी, मा केंद्रप्रमुख तसेच स्कूल कमिटी, महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच समस्त शिक्षण प्रेमी ग्रामस्थ व पालक वर्ग अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

 
			

 
					 
							 
							