वालचंदनगर पोलिसांनी व्हाट्सअप वर धमकी देत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


 

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये सध्या अवैध धंद्यावरती व गुन्हेगारांवरती होत असलेल्या कडक कारवाईने चर्चेत आले असून, लोकांमध्येही पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे, त्यातच नव्याने आलेले प्रभारी अधिकारी मनोजकुमार डुगणे यांनीही कारवाईचा धडाका चांगलाच लावला आहे त्यामुळे अवैध धंद्या वाल्यांचे व गुन्हेगारांचे कंबरटे चांगलेच मोडले आहे, वालचंदनगर पोलिसांनी व्हाट्सअप वर तलवारीसह धमकी देत व्हिडिओ वायरल करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, सुरज कांबळे (वय ३१) रा.अशोकनगर वालचंदनगर) असे आरोपींचे नाव आहे, याबाबत पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सुरज कांबळे हा व्हाट्सअप वर तलवारीसह धमकी देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये दहशत पसरवत असल्यांचे समजले त्यांनी तपास पथकांतील पो.कॉ. विक्रमसिंह जाधव पो. ना जगदीश चौधरी यांना तात्काळ कारवाई करून आरोपींला ताब्यांत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने तपास पथकांतील पोलिसांनी सदर आरोपींस ताब्यात घेवुन तसेच त्याच्याकडूंन एक तलवार देखील जप्त करण्यात आले आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड स.पो.नि. राजकुमार डुगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. विक्रमसिंह जाधव पो. ना. जगदीश चौधर पो. कॉ. कळसकर पो.कॉ. बेलदार पो. हवा. स्वामी यांच्या पथकांने ही कारवाई केली,*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!