दरोडा गुन्ह्यांतील दोन वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आरोपींच्या शिरुर पोलिसांनी मुसक्या आवळल्या:- शिरूर पोलिसांची कामगिरी.
संभाजी गिरी गोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
शिरूर पोलीस ठाणेचा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगलीच पावले उचलली आहेत, आधीं जन सुनवाई मगच कारवाई अशी त्यांची कामाची पद्धत शिरूरकरांना दिसून येत आहे, त्यांच्या धडक कारवाईमुळे पोलीस ठाणेच्या परिसरांतील सराईत गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत, शिरूर पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील असणाऱ्या दोन वर्षांपूर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकला होता, त्यापैकी १२४० कोंबड्या विक्री करून सदर विक्रीतून मिळालेली रक्कम ही आरोपींनी वाटून घेतली होती, तसेच हा गुन्हा घडल्यापासून आरोपी प्रदीप उर्फ प्रदयुमन हरिश्चंद्र शिंदे रा. करंजेनगर ता. शिरूर जि. पुणे ) हा गेले दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता, अखेर शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांने अखेर गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रदीप शिंदेच्या शिक्रापूरच्या परिसरांत मुसक्या आवळल्या आहेत, आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांने अटक केल्याने परिसरांतून शिरूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक होत आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. हनुमंतराव गिरी पो. हवा. परशुराम सांगळे नाथसाहेब जगताप विनोद मोरे पोलीस अंमलदार विजय शिंदे निरज पिसाळ निखिल रावडे निलेश थोरात सचिन भाई रघुनाथ हळणारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.

 
			

 
					 
							 
							