किकवी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी यांची जयंती साजरी..


 

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

ग्रामपंचायत कार्यालय किकवी येथे आज २ऑक्टोंबर २०२४रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व “स्वच्छ माझे आंगण” अभियानात ज्या महिला वर्गाने सहभागी होऊन काम केले,अशा सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ADVERTISEMENT

प्रसंगी विद्यमान सरपंच नवनाथ सयाजी कदम,माजी सरपंच नवनाथ भिलारे,माजी उपसरपंच मौलाद्दिन शेख,सामाजिक कार्यकर्ते राजेश काकडे,अंगणवाडी सेविका-स्वाती पाटणे,किरण निगडे,वैशाली मोहिते, व किकवी गावातील सहभागी महिला उपस्थित होत्या.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!