लोणंद येथे सादिक बागवान यांच्या सावधानतेमुळे ज्वेलर्सवरील दरोडा टळला
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद शहरात असणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील वाघमोडे ज्वेलर्स या दालनावर मध्यरात्री 3.30 वाजता 4 ते 5 दरोडेखोर हे दुकानातील सर्व दाग-दागिने लंपास करण्याच्या तयारीत होते.
चेहऱ्यावर मास्क बांधून, हातात दुकान फोडण्यासाठी लागणारे सर्व लोखंडी साहित्य आणि धारधार हत्यारे अशा अवस्थेत असलेले तरुण दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश कारणात तोच तेथून दुचाकीवरून जात असलेले श्री.सादिक जब्बार बागवान यांनी प्रसंगावधता दाखवत घडलेला प्रकार हर्षवर्धन शेळके पाटील यांना फोन वरून कळवला. त्यानंतर लोणंद पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क करून घडलेली घटना व वापरात आलेली लाल कलरची होंडा सिटी गाडी नंबर MH 14 CC 2028 याची माहिती दिली.सदरची चारचाकीचा पाठलाग केला असता ती गाडी ज्वेलर्स कडून स्टॅन्ड कडे नंतर सातारा रोड कडे व पुन्हा खंडाळा रस्त्याकडे भरधाव वेगाने निघून गेली.
श्री.शेळके यांनी ज्वेलर्सचे मालक श्री.वाघमोडे यांना सुरु असलेल्याघटनेची माहिती देऊन लगेचच घटनास्थळी जाण्याची सूचना केली.
पहाटे हर्षवर्धन शेळके यांच्या सोबत पारगावी जायचे असलेने आपल्या नजरेत घडत असलेले चोरीचे कृत्य पाहताच बाळगलेल्या सावधानतेमुळे लाखो रुपयाचे नुकसान होनेपासून वाचले.
दरोडा पडण्यापासून वाचल्याने सादिक जब्बार बागवान यांचे लोणंद मधील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


