च-होली बुद्रुक येथे फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव; भव्य कार्यक्रमांची मेजवानी


पुणे प्रतिनीधी | एस.एन.नांदेडकर

 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त च-होली बुद्रुक येथील सप्तगड गृहनिर्माण संस्था, कोतवालवाडी येथे जयंती महोत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सप्तगड भीम जयंती महोत्सव व तथागत वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

 

या महोत्सवांतर्गत ११ एप्रिल रोजी प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांचे सायंकाळी ७ ते १० या वेळेत व्याख्यान होणार आहे. १४ एप्रिल रोजी व्याख्याते नितीन घोडके यांचे सकाळी ९ ते १० या वेळेत मार्गदर्शन होईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

ADVERTISEMENT

 

या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष व आमदार पिंपरी विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, आमदार भोसरी विधानसभा महेश दादा लांडगे, आमदार विधानपरिषद अमित भाऊ गोरखे, महापौर रवी भाऊ लांडगे, माजी महापौर नितीन आप्पा काळजे, आयुक्त समाज कल्याण विशाल लोढे, माजी उपमहापौर तुषार भाऊ हिंगे, नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, नगरसेविका सारिकाताई गायकवाड, नगरसेविका अर्चना ताई सस्ते, नगरसेवक डॉ सुहास कांबळे, माजी नगरसेवक विकासभाऊ डोळस, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालीनी संभाजी कर्डक, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अँड सर्वजीत बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हिंजवडी पोलीस स्टेशन विकास ताकतोडे, नगरसेवक सागर भाऊ गवळी, सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ तापकीर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब भगवत, अध्यक्ष धम्मचक बौद्ध विहार सुरेशजी कसबे, माजी नगरसेविका विनयाताई तापकीर, दै. लोकराज्य पत्रकार एस. एन. नांदेडकर सर, शिवव्याख्याते संपत गारगोटे, युवा नेते विनोद गायकवाड, युवक प्रदेश उपाध्यक्ष दशरथ ठाणाबीर, दैनिक लोकमत पत्रकार प्रशांत होनमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोतवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तक्षशिला बौद्ध विहार च-होली, शिव फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती तनिष्क ऑरचीड, विक्रम शिला प्रबोधिनी दिघी, मॅगनीज चौक व तक्षशिला बौद्ध विहार निरगुडी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

 

या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी व पुणेकर नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने रंगनाथ वाघमारे साहेब यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!