आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा राज्यस्तरीय स्नेहसंमेलन 3 मे रोजी; नियोजनाला वेग
पुणे प्रतिनिधी |एस.एन.नांदेडकर
“आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राज्यस्तरीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाची निश्चित तारीख रविवार, 3 मे 2026 अशी जाहीर करण्यात आली आहे. हे संमेलन पुण्यातील आनंद मंडळ बुद्धविहार, दत्तवाडी येथे पार पडणार आहे.
या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर चळवळीच्या राज्य प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी तसेच सहकारी सदस्यांची महत्त्वपूर्ण नियोजन प्रक्रिया सुरू असून, संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध स्तरांवर तयारी करण्यात येत आहे.
राज्यभरातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण करणे, चळवळीची पुढील दिशा निश्चित करणे आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना बळकटी देणे, हा या स्नेह संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
“चला, एकत्र येऊया माणूस जोडू या, विचारांची देवाण-घेवाण करूया आणि चळवळीला नवी दिशा देणारे ऐतिहासिक संमेलन यशस्वी करूया,” असे आवाहन मुख्य समन्वयकांनी केले आहे.


