वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.


 

भोर प्रतिनिधी : सागर खुडे

वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात लहान वयापासूनच आपल्या नावाची समाजात एक वेगळी छाप उमटवणारे, व्यावसायाच्याद्वारे सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहून नेहमी उस्फुर्तपणे कार्यरत राहणारे वागजवाडीचे युवा उद्योजक प्रथमेश उर्फ बन्सी रुपेश मोरे यांनी आज दि.४रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त किकवी पंचक्रोशीतील सिद्धेश्वरनगर, वागजवाडी, राऊतवाडी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील, अंगणवाडी शाळेतील ६०विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

ADVERTISEMENT

 

या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे आधिकारी वर्ग, ग्रामपंचायत वागजवाडी(राऊतवाडी) विद्यमान सरपंच निकिता आवाळे,उपसरपंच वागजवाडी(राऊतवाडी) समीर आवाळे, केंजळ ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि उद्योजक राकेश बाठे, वागजवाडी(राऊतवाडी) ग्रामपंचायत सदस्य संतोष राऊत, सामाजिक कार्यकर्ते रमेश राऊत, गोपाळ राऊत, बंडू आवाळे, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापिका सौ.बढे/पोळ, जेष्ठ सहशिक्षिका सुनंदा काकडे,ज्योती कदम यांसह त्यांचा मित्रवर्ग आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!