लोणंद- कै.दिपाली होवाळ यांचे अवयवदान.


लोणंद प्रतिनिधी : सुभाष ढोणे

अंदोरी ता.खंडाळा येथील दिपाली किरण होवाळ या त्यांच्या पती समवेत रविवारी रात्री १०.वा.चे सुमारास पुणे ते शिरवळ असा दुचाकी वरून प्रवास करीत असताना अपघात झाला होता. उपचारा दरम्यान काल रात्री त्यांची प्राण ज्योत मालवली.

ADVERTISEMENT

त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यातून स्वतःला सावरत ह्या कुटुंबाने त्यांच्या शारीरिक अवयवाचा गरजूला अनमोल उपयोग व्हावा, या उदात्त आणि सामाजिक भावनेतून हृदय, फुफ़ुस, स्वादुपिंड, लिव्हर, जठर, लहान आतडे आणि दोन्ही किडनी असे सात अवयव दान केले आहेत. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे अवयव दान करण्याचे ठरवले.व त्यांचे सातही अवयव दान करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.मृत्युनंतरही या अवयवाच्या रूपाने दिपाली आपणा सर्वांच्यात असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यांच्या पश्चात पती,२ मुले,सासू, सासरे असा परिवार आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!