निरा-देवघर कॅनॉलच्या कामात आमदारांच्या राजकीय हस्तक्षेपास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध


लोणंद :दिलीप वाघमारे

 

निरा-देवघर कॅनॉलचे काम प्रगतीपथावर सुरु असून लोणंद पंचक्रोशीतील नागरिकांना विश्वासात न घेता काम पुर्ण करण्याच्या घाट अधिकारी वर्गाने घातला आहे. खेड,आनंदनगर, ठोंबरेमळा, गोटेमाळ, जांभळीचामळा, माळी आळी, लोणंद औद्योगिक वसाहत इतरत्र ठिकाणच्या शेतकऱ्यांना या कॅनॉलच्या पाण्याचा फायदा होणार नसेल तर कॅनॉलचे काम बंद करण्याच्या निर्णय समाजकल्याण विभागाचे माजी सभापती मा.आनंदराव शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.

यावेळी चेअरमन हिरालाल धायगुडे, डॉ.महेश शेळके, शिवाजीराव पाटील, विठ्ठलराव केसकर, संदीप शेळके, धनपाल शेळके, संग्राम शेळके, बाळकृष्ण भिसे, नानासो शेळके, आप्पासाहेब शेळके, महादेव ज.शेळके, शरद शेळके, बबनराव शेळके, महादेव र.शेळके, राहुल भंडलकर, नवनाथ शेळके, नंदकुमार शेळके, रोहित शेळके, उत्तम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

लोणंद शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे आणि दुर्दैवाने कॅनॉलचे काम देखील याच डेव्हलपमेंट प्लॅन मधील येलो झोन मधून जात आहे. जे क्षेत्र शेतीचे नाही त्यामधून कॅनॉल जाऊन काय फायदा? असा सवाल हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी केला.

ADVERTISEMENT

वाघोशी गावापासून तुळशी वृंदावन धरणात उपसा सिंचन करून पाणी सोडण्यात येणार आहे परंतु, त्याचा अद्यापही प्लॅन पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नाही असे अधिकाऱ्यांच्याकडून समजले, काही राजकीय मंडळी अधिकाऱ्यांना भेटून वारंवार सर्व्हे बदलत असल्याचे निदर्शनास आले आहे तसा पत्रव्यवहार मा.जिल्हाधिकारी तसेच कॅनॉलचे संबंधित अधिकाऱ्यांना करणार असल्याचे नानासो शेळके यांनी सांगितले.

लोणंद हद्दीतून काम सुरु केल्यापासून आज पर्यंत एकाही शेतकऱ्याला जमीन अधिग्रहण करण्याच्या नोटीसा किंवा तोंडी सुचना दिल्या नाहीत, आमदारांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकरी नसलेल्या पुढाऱ्यांचे अधिकारी वर्ग ऐकतो व कॅनॉलचा सर्वे वारंवार बदलला जातो असे चेअरमन हिरालाल धायगुडे यांनी सांगितले.

सदरचे काम वाघोशी पासून लोणंदकडे न येता तुळशी वृंदावन धरणात पाणी सोडावे, सरकाचे 70-30 चे उपसा सिंचन धोरण शेतकऱ्याला परवडणारे नाही, धरणात पाणी सोडूनच कॅनॉल पुढील तालुक्याकडे घेऊन जावावा, तरच सर्व क्षेत्र ओलिताखाली येईल अशी मागणी डॉ.महेश शेळके आणि उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

निरा-देवघरचे कॅनॉलचे पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी मी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे समाजकल्याण विभागाचे माजी सभापती मा.आनंदराव शेळके पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!