उत्साह, चैतन्य अन् धम्माल मस्तीच्या वातावरणात रंगला खेळ पैठणीचा! गंगापूजनाच्या कार्यक्रमाचं देखील लाभल भाग्य ” नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती.
सारोळे : महिला भगिनींच्या अडीअडचणीत हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी नुकताच भोर विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला. उत्साह, चैतन्य, स्पर्धा, धमाल आणि आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणाऱ्या या कार्यक्रमास खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती लावली.
तत्पूर्वी किरण दगडे यांनी काशी यात्रा घडविलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक गंगापूजन कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडला.

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून महिलांना सुखकारक दिलासा देणारा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमात महिलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळाला विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होत स्वतःला सिद्ध केले. यावेळी पूनम सुरज मिसाळ, संगीता श्रीकांत कुरुडकर, वैशाली संजय फाटक, अंकिता श्रीकांत भोरडे या भगिनी मोठ्या बक्षीसांच्या मानकरी ठरल्या. तर सहभागी प्रत्येक महिलेला देखील उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू मिळाल्या. अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष भाजप भोर जीवन आप्पा कोंडे ,वेल्हे तालुका अध्यक्ष भाजप आनंद देशमाने ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेबजी गरुड, जिल्हाउपाध्यक्ष विनायकजी ठोंबरे, भोर शहर अध्यक्ष सचिनजी कन्हेरकर, विनोदजी चौधरी, महिला अध्यक्ष भोर आशाताई शिवतरे, युवा मोर्चा अध्यक्ष भोर अमर बुदगुडे, युवा मोर्चा अध्यक्ष वेल्हे मेघराज हनमघर ,राजेंद्रजी मोरे उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



