भोंगवली ग्रामपंचायतीवर कारवाईची तलवार! विकासकामांच्या नोंदी तातडीने सादर करण्याचे आदेश”
दि. 17 सारोळे :- भोर तालुक्यातील मौजे भोंगवली ग्रामपंचायतीतील विकासकामे व निधी वापराच्या नोंदी तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांना नोटीस देण्यात आली आहे.
जा. क्र. पंचा/वशी/2/4215/2025 या क्रमांकाने जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की सरपंच पवार यांच्या कार्यकाळातील विकास कामे, अंदाजपत्रके, मासिक सभा ठराव, मूल्यांकन, देयके तसेच निधी वापराच्या सर्व नोंदी तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात.

यापूर्वी गटविकास अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांनी दिलेल्या अहवालात संबंधित अभिलेख उपलब्ध न झाल्याने चौकशी होऊ शकली नाही, असे नमूद करण्यात आले होते. आता भोर पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून अभिलेख उपलब्ध न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 व जिल्हा परिषद व जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 अन्वये प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


