नेरे गावाजवळ मोरीवर भोर मांढरदेवी रस्त्यावर डंपर खचला! निकृष्ट दर्जाचे काम.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
भोर तालुक्यातील नेरे गावाजवळील उंबरीची वाहाळ येथील मोरी शेजारी डंपर खचल्याने सदरची घटना घडली.अगदी तीन महिन्यापूर्वी केलेल्या या कामाच्या दर्जा विषयी सहाजिकच संशय निर्माण होतो. सदर मोरीचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे आहे ही सदर कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे विचार केला तर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तितकाच धोकादायक बनल्याचे या ठिकाणी झालेले घटनेतून दिसत आहे. एवढा महत्वाचा विषय असूनही सदरच्या कामात प्रचंड निष्काळजीपणा करण्यात आला आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांचे फोन नॉट रिचेबल होते. हा विषय तर एका कामापुरता नसून भोर पासून मांढरदेवी वाई फाट्यापर्यंत झालेल्या रस्त्याच्या कामाविषयी प्रश्न निर्माण होतो. अधिकारी, आणि बेफिकीर ठेकेदार यांच्या संगणमतातून ही कामे होत असल्याची चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा मोठ्या जनरोशाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्थानिकांकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आला.


