अनोळखी इसमाचा अज्ञातांकडून सिमेंट काँक्रीटचा मोठा तुकडा घालून खून .
लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
लोणंद गावचे हद्दीत रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये सिमेंटचे बाकाजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटात्तील प्रेताचा कोणातरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांसाठी डोक्यात सिमेंट काँक्रीटचा मोठा तुकडा घालून खुन केला आहे. असून या घटनेची लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की सोमवारी सकाळी 10.30 वाजताचे सुमारास स्टेशन मास्टर हिरामण रामटेके असे त्यांचे रूममध्ये बसलो असताना शाळेतील मुलांनी येवुन सांगितले की रेल्ये गार्डनमध्ये सिमेंटच्या बाकड्याजवळच एका माणसाची बॉडी पडलेली आहे असे सांगितल्याने स्टेशन मास्टर हिरामण रामटेके यांनी मला सदरची घटना काय आहे हे बघुन येण्यास सांगितले म्हणुन नी बेलों स्टेशन गार्डनमध्ये जावुन पाहिले असता रोथे मला एक पुरुष जातीचे अंदाजे दा 30 ते 35 वयोगटातील प्रेत दिसुन आले. त्याच्या डोक्यावर सिमेंट काँक्रीटचा मोठा तुकडा दिसला शरीरावर व आजुबाजुला जमिनीवर रक्ताचे डाग पडलेले होते. आजुबाजुला फरशीचे तुकडे पडलेले दिसले. सदर मयत इसमाचे अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पेन्ट, अंगावर मळेबंद पिशवी असलेली दिसली, प्रेताची पॅन्ट व अंडरवेअर मांडी पर्यंत उचडी असलेली दिसली हे बघून खात्री झाली की अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खून केला आहे.असे रेल्वे पोलीस विजय किशोर गार्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
घटनास्थळावर लोणंदचे सपोनि सुशील भोसले पोलीस पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे सर्जेराव सूळ विठ्ठल काळे महेश सपकाळ नितीन भोसले रेल्वे सुरक्षाबल निरीक्षक सतवीर सिंग सहाय्य्यक उपनिरीक्षक अशोक हजारे कॉन्स्टेबल विजय गार्डे यांनी पंचनामा केला श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते यावेळी वीरा नावाचे श्वान त्याच परिसरात घुटमळले