आंबेगाव बु. पुणे शाळेत “विठुरायाच्या “गजरात दिंडी सोहळा संपन्न.
उपसंपादक : सागर खुडे
महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित, राजर्षी शाहु विद्या मंदिर आंबेगाव बु।।, पुणे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करन्यात आला होता. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘वाहतुकीचे नियम व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक हातात घेवून घोषणा देत जनजागृती केली.

दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. आमदार उल्हास पवार यांच्या प्रेरणेतून व संस्था अध्यक्ष प्रा.डॉ. व्हि. एस. अंकलकोटे पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून प्रशासकीय संचालक उत्तम चव्हाण, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिनल साने व सर्व शिक्षक उपस्थित होते. उपाध्यक्ष सौरभ अंकलकोटे पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

तसेच या सोहळ्यानिमित विद्यालतील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध संताच्या वेशभूषेत सहभागी होते. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर विद्यार्थीनीनी नऊवारी साडी असा पोशाख परिधान करून दिंडीची रंगत वाढविली. त्यानंतर वाहतुकीचे नियम, नाटिका, स्वरचित गीत, नृत्य छ. सादरीकरण करून हरिनामाचा जयघोष केला. दिंडीमध्ये फुगड्या विविध खेळ यांचा आनंद सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही लुटला विदयालयापासून सुरु झालेला हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.

‘या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईप्रेम मानकरी यांनी केले गीतरचना कासार बाळासाहेब यांनी केले तर गीताला साथ शिवानी कोटीभास्कर यांनी दिली.
ट्रॅफिक दादा या नृत्याचे दिग्दर्शक आलुरे श्रीदेवी आणि हर्षद बोबडे यांनी केले. तर विठ्ठला विठ्ठला या गीताचे नृत्य दिग्दर्शन ज्योती माने व प्रमोद डंबरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षिका राणी,विमल,कासारबाई, शिवानी देशमाने,रूतुजा ,महारूळकर तर शिक्षक घोगरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षिका राणी, विमल,कासारबाई, शिवानी, देशमाने ,रूतुजा ,महारूळकर आणि शिक्षक घोगरे आणि हर्षद बोबडे यांनी मोलाचे सहकार्य केले.



