निधी मंजुरीचा सन्मान, विचारांचा महोत्सव; पुण्यात 3 एप्रिल रोजी रंगणार काव्यसंमेलन ”


पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त “भारतीय असल्याच्या जाणिवेतून – तरी आम्ही बोलू नये?” या संकल्पनेवर आधारित वैचारिक कवितांचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

 

 

रमणी प्रेझेंट्स, पुणे यांच्या वतीने आयोजित या काव्यसंमेलनात अनेक मान्यवर कवी विचारप्रवर्तक कविता सादर करणार आहेत. कार्यक्रमात रमणी बबिता आकाश, सुमित गुणवंंत, हृदयमानव अशोक, नितीन घोडके, पार्थ भेंडकर, किरण प्रकाश, विजय लोखंडे, स्वराज समदूर, श्रेया वाघ, प्रतीक तायडे, संभाजी शिंदे, सुभाष गवळी, रवी कांबळे, प्रवीण वानखेडे, अनिषा दोडके, धम्मदीप सरकटे, विक्की कांबळे, मिलिंद सोनकांबळे आदी कवी सहभागी होणार आहेत.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमाला महापौर मा. मंजुषाताई नागपुरे, मा. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ सामाजिक नेत्या मा. लताताई राजगुरू, उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, आयुक्त मा. नवल किशोर राम आणि स्थायी समिती अध्यक्ष मा. श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वाडिया कॉलेज समोर असलेल्या महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक रमाईपुत्र विठ्ठलदादा गायकवाड असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!