वाघजवाडी अंगणवाडीत बाल आनंद मेळावा उत्साहात; चिमुकल्यांच्या नृत्याने रंगला सोहळा


मंगेश पवार

किकवी :- वाघजवाडी येथील अंगणवाडी केंद्रात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा बाल आनंद मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात सुमारे २० ते २५ बालकांनी विविध नृत्य सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.

चिमुकल्यांनी हिंदी गाणे “पापा मेरे पापा” तसेच मराठीतील लोकप्रिय गाण्यांवर सादर केलेल्या आकर्षक नृत्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. त्यांच्या कलागुणांनी पालकांसह ग्रामस्थांनाही अभिमान वाटला. उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी मुलांवर बक्षिसांचा वर्षाव करत त्यांचे कौतुक केले.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमासाठी वाघजवाडीच्या सरपंच निखिता आवळे, उपसरपंच  समीर आवळे, अंगणवाडी सेविका अर्चना आवळे, मंजुषा आवळे यांच्यासह बीव्हीजी १०८ इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मंदार सुरेश माळी (किकवी) तसेच किकवी परिसरातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. मंदार माळी यांनी लहान मुलांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असून, अंगणवाडी सेविका व शिक्षक मुलांच्या घडणीत मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांनी विशेष आभारही व्यक्त केले.

एकूणच, वाघजवाडीतील हा बाल आनंद मेळावा उत्साह, आनंद आणि अभिमानाचा ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!