वारकरी संप्रदायातील ह.भ.प नवनाथ महाराज लिमन यांनी भोर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ चे दर्शन घेतले. 


 

दि. 25 भोर प्रतिनिधी : तालुक्यातील वारकरी संप्रदायातील नसरापूर बनेश्वर माळेगाव येथील

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त

ह भ प श्री नवनाथ महाराज लिमन यांनी भोर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ चे दर्शन घेतले.

 

नसरापूर माळेगाव येथे माऊली आधार अनाथ आश्रम नवनाथ महाराज यांच्या माध्यमातून चालू असून या ठिकाणी जवळपास ७५ अनाथ विद्यार्थी असून सुंदर अशा वातावरणात राहुन शिक्षण घेत आहेत

नवनाथ महाराज प्रवचनाच्या माध्यमातून मिळणार्या मानधनातून खर्च भागविण्यासाठी प्रयत्नशील असतात

तसेच अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती वाढदिवस विविध आनंदाचे क्षणी मदत करीत असतात.

 

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वतीने दिवाळी मध्ये भाऊबीज ला येथील सर्व विद्यार्थ्यांना सोबत साजरी करण्यात आली होती .

 

स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये

स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी दत्त जयंती सप्ताह मध्ये दिलेल्या निमंत्रणावरून आज भेट दिल्याचे नवनाथ महाराज यांनी सांगितले

केंद्रातील प्रसन्न वातावरण स्वच्छता, नियम,

तसेच केंद्रात आल्यावर पायावर पाणी घेणे, औदुंबर ला प्रदक्षिणा, यज्ञ कुंड, राशी नुसार लावलेली झाडे, स्वामी ची नित्य आरत्या, नैवेद्य, अभिषेक ईत्यादी माहिती स्वामी सेवेकरी श्री अतुल गाढवे यांनी दिली.

स्वामी केंद्र मध्ये आमंत्रित केले बद्दल नवनाथ महाराज नी आभार मानून भविष्यात प्रवचन किर्तन सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

यावेळी नवनाथ महाराज बरोबर

बाल किर्तनकार ह भ प आर्यन महाराज व आश्रम मधील विद्यार्थी

भोर तालुका सकल मराठा चे विजय अंबवले

स्वामी सेवेकरी संतोष कदम अतुल गाढवे उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!