बीड मधील वातावरण तापलं नवे पोलीस अधीक्षक अँक्शन मोडवर, बीड जिल्ह्याचा कायदा आणि सुव्यवस्था सरळ करणार कारवायांना सुरुवात :- नूतन पोलीस अधीक्षक नववीत कॉवत.
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले आहेत, अधिवेशनात सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणावर चर्चा केली होती, या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कामात कुचराई केल्याने त्यांची बदली करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिवेशनात सांगितले होते, आणि याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली, बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कामात कुचराई केल्याने पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या बदलीनंतर अविनाश बारगळ यांनी बीड पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता, नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, नवनीत कॉवत 2017 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी धाराशिव पुणे ग्रामीण तर छत्रपती संभाजीनगर शहरांत पोलीस उपायुक्त असलेले नवनीत कॉवण यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला आहे, नववीत कॉवत हे धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख आहे, आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ते करणार आहेत, तसेच नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मराठवाड्याचा दांडगा अनुभव आहे, तरीही नूतन पोलीस अधीक्षकांसमोर बीड जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे,