न्याय देणारेच अडकले लाच प्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल, तात्काळ जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी,


 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचार विरुद्ध न्याय मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय, लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्यांने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरोधाची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढवली जाते, मात्र साताऱ्यात चक्क न्यायाधीशच लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या जाळ्यात आल्यांने राज्यांत एकच खळबळ उडाली आहे, साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये न्यायाधीशाला लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे, फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची केली होती मागणी, या प्रकरणात तिघेजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत, या संशयिता मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा देखील समावेश आहे, तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात अशी इतर दोघांची नावे आहेत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांने ही संयुक्त कारवाई केली आहे याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे, त्यामुळे सर्व सामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील आता विश्वासांवर देखील या घटनेमुळे तडा गेला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!