बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण:- तपासाबाबत गृहमंत्री देवेंद्र जी. फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक.
संभाजी पुरीगोसावी
दि.१२ पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात 40 गावातील 450 सराईतांची चौकशी करण्यात आल्यावर पोलिसांना महत्वांचे धागेद्वारे हाती लागले असून यामध्ये एकाला अटक तर दोघांना नागपूर येथून ताब्यांत घेण्यात आली आहे, राज्यांचे गृहमंत्री देवेंद्र जी. फडवणीस यांनीही माहिती जाहीर करत कोणतेही धागेद्वारे हाती नसताना पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे, पुणे शहरांत नव्याने सुरू करण्यात आलेल्या सात पोलीस ठाणेच्या उद्घाटन प्रसंगी फडवणीस यांच्याहस्ते करण्यात आले, या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासात तसेच येवलेवाडी परिसरांतील सी.सी.टीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या माहितीनंतर एकाला येवलेवाडी परिसरांतून ताब्यात घेण्यात आले आहे त्यानंतर प्रसार झालेल्या दोघांना नागपूरमधून ताब्यांत आले आहे, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे असेही फडवणीस यांनी सांगितले आहे, बोपदेव घाट परिसरांत गुरुवारी (3 ऑक्टोंबर ) रोजी आपल्या मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती, यामध्ये पसार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी 60 पथके तयार केली होती, पुणे शहरांतील प्रमुख टेकड्या,घाट परिसर विनयभंग बलात्कार,दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची देखील चौकशी करण्यात आली आहे, बोपदेव घाट परिसरांतील जवळपास 40 गावांमध्ये जावुन पोलिसांनी पाहणी केली त्या गावातील ढाबे,दारूविक्रेते बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे, पोलीस रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सी.सी.टीव्ही तपासणी चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या ग्रामीण पोलिसांच्या सासवड राजगड पोलीस ठाणेकडील तपासी पथकांची मदत घेण्यात आली होती, पोलीस आयुक्त अमितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त निखिल पिंगळे आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांने ही कारवाई केली आहे.


