सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!नाव गुप्त ठेवणार.
मुख्य संपादक: मंगेश पवार
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. आरोपीचा पत्ता सांगा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.
मसाजोग प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश येत असल्यामुळे आक्रमक मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. जवळपास हत्येला 25 दिवस उलटले तरी आरोपींना अटक होत नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दरम्यान आरोपीला पकडण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी शक्कल लढवली आहे. गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा असे जाहीर करण्यात आले आहे.
वाल्मिक कराडवर सरपंच हत्या प्रकरणाशी संबधित पवनचक्की प्रकल्पात दोन कोटी रूपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माईंड वाल्किम कराडच असल्याचा आरोप केला जातोय. अजूनही तीन आरोपी फरार आहेत. या तिघांना अटक करण्यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. आरोपींना कधी अटक होणार याची तारीख सांगा. तुम्ही जी तारीख सांगाल तोपर्यंत आम्ही तुम्हाला एका शब्दानेही बोलणार नाही , नाहीतर आम्हाला गोळ्या घाला, असे गावकरी म्हणाले. गावकऱ्यांचे हे आंदोलन जवळपास दोन तास सुरू होते. अखेर बीडचे नवे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
. मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर*
गावकऱ्यांचा रोष, विरोधकांचा आरोप, मुक मोर्चे, आंदोलनाने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. आता या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केले आहे. यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रसिद्धपत्रक जाहीर करत आरोपींना फरार घोषित केले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
. नाव गुप्त ठेवणार
फरार तिन्ही आरोपी सापडल्यास अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध केले आहेत. हे आरोपी कुठेही दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलिसांनी केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याला योग्य बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक : सागर खुडे