बीडचे नवे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, 28 पोलीस ठाणे हद्दीत 36 कारवाया लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, कारवाईचा दणका सुरूच,
उपसंपादक संभाजी पुरी गोसावी
बीड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देखील अँक्शन मोडवर आले आहेत, अधिकाऱ्यांसोबत नवनियुक्त पोलीस अधीक्षक देखील ॲक्शन मोडमध्ये आहेत, 28 पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये 63 अवैध धंद्यावर कारवाई करून जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अवैध धंदे करणाऱ्या विरोधात एसपी नवनीत कॉवत यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलिसांनी मोहीम उडवली आहे, पोलीस दलाच्या बैठकीत कामात कुचराई करणाऱ्यांची गई केली जाणार नसल्याचा इशाराही नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे, सोमवारी पोलिसांनी केलेल्या 27 कारवाई 34 जणांवर जुगार खेळणे व खेळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून 87 हजार 440 रुपयांचा मध्यमान हस्तगत केला आहे, यामध्ये अवैध दारू विक्री अड्ड्यांवर 36 ठिकाणी छापे मारून 36 जणांवर गुन्हे दाखल करीत दोन लाख 50 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, जिल्ह्यात 36 कारवाया करीत पोलिसांनी आपली जबर निर्माण करण्यास सुरुवात केली आहे, बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देखील पोलीस अधीक्षकांनी सक्त सूचना दिल्या आहेत.


