पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची भेट — भोर तालुक्यासाठी नविन बस मार्ग व फेऱ्यांची मागणी मान्य


संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

दि. 17 भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील नागरिकांना बससेवेच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवार दि. 17 रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची विशेष भेट घेतली. या भेटीत तालुक्यात नविन बस मार्ग सुरु करणे, थांबा वाढविणे, बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ तसेचनवीन लांब पल्यासाठी पुणे कोल्हापूर एसटी बस थांबण्यासाठी सारोळे येथे विनंती थांबा सुरु करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण चर्चा झाली.

ADVERTISEMENT

 

गणेश निगडे यांनी भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन विविध भागांमध्ये पुरेशा प्रमाणात बस फेऱ्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची सविस्तर माहिती दिली. या मागण्यांवर त्वरित प्रतिसाद देत पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले असून सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती दिली.

 

या निर्णयामुळे भोर तालुक्यातील विविध गावांना अधिक चांगली परिवहन सेवा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांची गैरसोय कमी होऊन, शिक्षण, व्यवसाय व दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

 

या सकारात्मक प्रतिसादाबद्दल गणेश शरदराव निगडे यांनी पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “सरकारी यंत्रणेकडून इतक्या तत्परतेने प्रतिसाद मिळणे ही अभिमानाची बाब आहे. ही सेवा भोर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,” असे गणेश निगडे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!