शिवसाम्राज्य प्रतिष्ठानकडून राजगड पोलिसांना निवेदन…
संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
देशभरात महिलांवरच नव्हे तर बालिकेंवरील लैंगिक अन्याय अत्याचार वाढले आहेत. जिकडे तिकडे मोकाट सुटलेले रोडरोमिओंमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे.
दि.२२सप्टेंबर रोजी अशाच प्रकारच्या विषयाला आळा बसावा. अशा पद्धतीचे निवेदन पत्र शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे नसरापूर शाखेचे अध्यक्ष प्रज्योत कदम आणि त्यांचे सहकारी यांसतर्फे देण्यात आले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की नसरापूर चेलाडी फाटा येथे श्री. शंकरराव भेलके माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय असून आसपासच्या भागातून विद्यार्थी मोठया संख्येने या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते.आणि ह्या महाविद्यालयाच्या आवारात कॉलेज भरण्या आणि सुटण्याच्या वेळेत काही उडाणटप्पू मोकाट फिरणारे रोड रोमिओ हिरोगिरी करीत आपल्या दुचाकीवर घिरट्या घालत असताना वारंवार निदर्शनास येते. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पॉक्सो सारखे गुन्हे मागील काही महिन्यांपूर्वीच घडलेले असतानाही यांना कुणाचा धाक राहिला नाही, त्याअभावी पुन्हा असा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने वेळेत सावधानता बाळगणे ही काळाची नितांत आवश्यकता आहे.महाविद्यालयाचा समोरील ब्रीजखाली सेवा रस्ता असून कॉलेज सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या वेळेत महिला किंवा पुरुष पोलीस आधिकारी यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थी शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्र तपासून घेण्यासाठी सक्ती करावी.
तसेच परप्रांतीयांचा या भागामध्ये कामासाठी देखील खूप वावर वाढलेला आहे.त्यामधेच बांधकाम व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर, टिंबर मार्केट, हॉटेल,लॉज व्यावसायिक, इंडस्ट्रियल कंपनी गोडाऊनमध्ये काम करणारे मध्यप्रदेश आणि बिहार येथून आलेले परप्रांतीयांचे पोलीस वेरिफिकेशन होणे गरजेचे आहे.भाडे तत्त्वावर जे कोणी परप्रांतीय राहत आहेत त्यांच्या घरमालकांनी देखील पोलीस स्टेशनला त्यांच्या आधार कार्ड जमा करावे. त्यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे नसरापूर-चेलाडी चौकातील ब्रिज खाली एक छोटेसे पूर्णवेळ पोलीस बूथ व्हावे जेणेकरून अनुचित दुर्घटना व गुन्हे रोखण्यासाठी प्रशासनास मदत होईल.
सदरचे निवेदन देण्याप्रसंगी साम्राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रज्योत कदम, उपाध्यक्ष सुरज भगत,सचिव विशाल शिंदे,अभिषेक वाईकर,नवनाथ कचरे, ओंकार चोरगे,निखिल भंडारी,प्रतीक कोंढाळकर आणि इतर सहकारी मित्र उपस्थित होते.