प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी भोर यांना निवेदन


संपादक:मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

भोर (१३ जून २०२५): प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय भोर येथे एकदिवसाचे जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे भोर तालुक्यातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

 

या आंदोलनास संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, शांततेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन होणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्त आणि शांतता राखण्याकरिता प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय रूपचंद कांबळे, बापु कुडले, हनुमंत सुजार, जगनाथ सपकाळ, हनुमंत सुतार,सचिन नवघणे,विलास गोळे, दत्ता पवार मोहन शेटे,भानुदास दुधाने,जितेंद्र धुमाळ तसेच तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!