वकिलाची पल्सर मोटारसायकल श्रीरामनगर खेडशिवापूरला चोरी.


 

खेड शिवापूर (हवेली) – श्रीरामनगर परिसरातील बाजीराव कॉम्प्लेक्ससमोरून एका वकीलाची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी अमर सुरेश दरडिगे (वय ३० वर्षे, व्यवसाय वकील, रा. रहाटवडे, ता. हवेली) यांनी दिलेल्या माहितीवरून, दिनांक ०९ जून २०२५ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली बजाज पल्सर NS 125 (MH12 TQ 3217) ही राखाडी रंगाची मोटारसायकल बाजीराव कॉम्प्लेक्स समोर, श्रीरामनगर, ता. हवेली येथे हँडल लॉक करून पार्क केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जून २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता त्यांना गाडी जागेवरून गायब असल्याचे लक्षात आले.

ADVERTISEMENT

 

गाडीची अंदाजे किंमत ४५,०००/- रुपये असून गाडीचे इंजिन नंबर JEXCME928264 व चेसिस नंबर MD2B72BX0MCE52431 असा आहे. ही मोटारसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. दरडिगे यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीसांनी BNS कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा गु.र.नं. २३२/२०२५ अन्वये नोंदवला आहे.

 

या प्रकरणाचा तपास राजगड पोनि राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. जाधव हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!