आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडाच्या परिसरांत :- येरवडा पोलिसांचा रूट मार्च, पोलीस स्टेशनकडूंन संवेदनशील भागात सूचना.
संभाजी पुरीगोसावी
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी पुढे असणाऱ्या विधानसभा निवडणूका शांततेत पार पाडावी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील जनतेकडूंन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात येरवडा पोलीसांनी जनतेला संवेदनशील सूचना करीत कायदा आणि व्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी आज रोजी येरवडा पोलिसांनी रूट मार्च काढला. सदर रूट मार्च हा पोलीस ठाणे हद्दीतील दाट लोक वस्तीतील लक्ष्मीनगर चौकी मधील भगवा झेंडा चौक, राज चौक चित्रा चौक भगतसिंग चौक संवेदनशील भागांतून तसेच जेलरोड चौकी हद्दीमधील नागपूर चाळ स्वराज मित्र मंडळ लुंबिनी गार्डन या भागातून रूट मार्च करण्यात आला. या रूट मार्चमध्ये परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव येरवडा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके बीएसएफ 30 बटालियनचे डेप्युटी कमांडर मनोजकुमार असिस्टंट कमांडर नीरज पांडे इन्स्पेक्टर अमनकुमार दोन अधिकारी व ५० कर्मचारी तसेच परिमंडळ 4 ची आरसीपी मोबाईल यावरील १ अधिकारी व ८ अंमलदार व येरवडा पोलीस ठाणेकडील २ अधिकारी व १५ अंमलदार असे या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.


