उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांच्या पथकांची यांची ईलेक्ट्रीक व्हीडीओ गेम पार्लर मशीनवरिल जुगार अड्ड्यावर धडक कारवाई.


 

संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

गुप्त बातमीदारांचे खबरेवरुन उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. रोशन पंडीत सा.व त्यांचे पथकांनी आठवडी बाजार हिंगणघाट येथील येथे भुते सोडा फँक्ट्ररी चे मागील बाजुस ए.आर. सर्व्हीस नावाचे दुकानात ईलक्ट्रानिक क्वाईन मशिन वर, चाबीचा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैशाचे हारजित चा खेळ तसेच, संगणकवर इंटरनेटचा उपयोग करून विविध आकड्यावर पैसे लावुन हारजित चा जुगार खेळ सुरु आहे. अशी विश्वसनिय गुप्त खबर मिळाल्याने सदर जुगार खेळाची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत साहेब यांना देवुन प्रत्यक्ष त्यांचे उपस्थितीत खबरेप्रमाणे आठवडी बाजार हिंगणघाट येथील ए.आर. सर्व्हीस नावाचे दुकानात जावुन तेथिल सुरु असलेल्या गेम पार्लरवर कारवाई केली असता. समीर वहीद खा पठान (वय 30 ) रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट यांचे ताब्यात असलेल्या दुकानातील भिंतीवर लावुन असलेले 1) इलेक्ट्राँनिक क्वाईन मशिन त्यामध्ये विन कंपनिच्या 2, मास्टर कंपनिची 1, सिल्वर कंपनिची 1, सेवन वंडर कंपनिची 1 असे नाव असलेले एकुण 5 मशिन व 10 चावी, जु.कि. 1,00,000/- रू. व ईलेक्ट्रीक साहीत्य असा एकुण जवळपास 1,59,020 / रु. चा जुगार मुद्देमाल आरोपींच्या ताब्यांतून हस्तगत करण्यात आला. सदर दुकानात संदिप पद्माकरराव सरोदे (वय 48) रा. चौधरी वार्ड हिंगणघाट जि. वर्धा, संजय सिताराम राउत (वय 52 ) रा. धामनगाव ता. हिंगणघाट जि.वर्धा, ईमरान मोहम्मद अख्तर (वय 36 ) रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट जि. वर्धा आशिष पाराशर रा. तिळक चौक हिंगणघाट जि. वर्धा , राष्ट्रपाल भालशंकर रा.विरभगतसिंग वार्ड हिंगणघाट जि. वर्धा व दोन विधीसंघर्षीत बालक जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री‌.अनुराग जैन व अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी रोशन पंडित हिंगणघाट यांनी व त्यांचे पो.हवा. नरेंद्र डहाके, अश्वीन सुखदेवे,आकाश कांबळे व राकेश ईतवारे यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!