भोर पंचायत समितीला अधिकारी फाईलला कॅबिनेटला मंजुरी मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समितीला अधिकारी फाईल ला कॅबिनेट मंजुरी मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने पेढे फटाकडे वाजवून आनंद उत्सव साजरा केला.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
दि.- २३.०९.२०२४ रोजी राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब होते ग्रामसेवक (एस ८) व ग्रामविकास अधिकारी (एस १२) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना २५५०० – ८११०० या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मुळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येणार आहे.
तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास १० वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस-१४), २० वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस – १५) व ३० वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस २०) असा मिळेल. या संदर्भात काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी पदनामास ला कॅबिनेट ला मंजुरी मिळाल्या बद्दल, काल भोर पंचायत समिति येथे झालेल्या तालुका व जिल्हा ग्रामसवेक संघटनेच्या बैठकीनंतर सदर मंत्री मंडळ निर्णयाबद्दल पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन व ग्रामसेवक युनियन भोर चे पदाधिकारी यांनी एकमेकांना पेढे वाटून व फटाके फोडून आंनद साजरा केला
यावेळी सदर ठीकाणी पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे कार्यक्षम अध्यक्ष अमोलजी घोळवे, सरचिटणीस श्री अनिल बगाटे, कार्याध्यक्ष श्री संदीप ठवाळ, कोषाध्यक्ष श्री संतोष भोसले, संघटनेचे नेते श्री नवनाथ झोळ, ऑन. सेक्रेटरी ग्रामसेवक पतसंस्था पुणे श्री पद्माकर डोंबाळे, भोर तालुका अध्यक्ष श्री अभय निकम, सचिव श्री विजय कुलकर्णी, मानद अध्यक्ष श्री. विजय गेजगे महिला उपाध्यक्ष भारती सुर्यवंशी, कार्याध्यक्ष श्री. दिपक सुरवसे, श्री. रूपेश हारपुडे, श्रीम. मोना सकपाळे, कोषाध्यक्ष रणजीत ननावरे, सहसचिव अनिल अभंग, व अन्य सर्व सहकारी सभासद हे उपस्थित होते.
यावेळी मा. जिल्हाध्यक्ष अमोलजी घोळवे यांनी सदर वेतन त्रुटीसाठी व नामकरणासाठी अतोनात प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी एन ई १३६) चे राज्य अध्यक्ष श्री संजीव जी निकम साहेब, सरचिटणीस श्री सूचित जी घरत साहेब, व युनियन च्या सर्वच शिलेदारांचे , तसेच सदर मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, ग्रामविकास मंत्री ना.श्री. गिरीष महाजन, उपमुख्यमंत्री ना.श्री. अजितदादा पवार, ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने आभार व्यक्त केले.


