बहुजनांच्या न्यायहक्कासाठी रिपब्लिकन सेनेची मागणी — भोर पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षणात अनुसूचित समाजाला न्याय मिळावा!
मंगेश पवार
भोर (प्रतिनिधी) –भोर, वेल्हा व मुळशी विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मा. किशोर अमोलिक यांनी आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, भोर पंचायत समिती व परिषद निवडणुकीतील आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित समाजाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
मा. अमोलिक यांनी पुढे सांगितले की, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार समानतेचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा आहे. मात्र आरक्षण प्रक्रियेत अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार सामाजिक समतेच्या तत्त्वांना विरोध करणारा असून त्याविरोधात रिपब्लिकन सेना तीव्र भूमिका घेणार आहे.”
या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, भोर यांना सादर करण्यात आली असून अनुसूचित जाती-जमातींना योग्य आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशाराही रिपब्लिकन सेनेतर्फे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जय भीम – जय भारत – जय संविधान!