धर्मवीर ज्वाला वाई शहरात दाखल, वढू तुळापुरहून आणली, लाखानगर येथील विठ्ठल मंदिरात तेवत ठेवली.
वाई प्रतिनिधी :आशिष चव्हाण
धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे अंत्यत हाल हाल करुन त्यांना औरंगजेबाने मारले. तो 11 मार्च दिवस या दिवसापासून महिनाभर श्री. शिवप्रतिष्ठानच्यावतीने व शंभूभक्तांकडून बलिदान मास पाळला जातो. त्या बलिदान मासाचा समारोप दि. 8 रोजी होणार असून त्याच अनुषंगाने वढू बुद्रुक येथून वाई तालुका शिवप्रतिष्ठानच्यावतीने धर्मवीर ज्वाला आणण्यात आली असून वाई शहरातून मुकपदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वाई येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांनी दिली.
धर्मवीर असे छ. संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. रयतेच्या राज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या निधनाच्या दिवसापासून दि. 11 मार्चपासून एक महिनाभर श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांकडून बलिदान मास पाळला जातो. दररोज गावोगावी छ. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येते. या बलिदान मासाचा समारोप दि. 8 एप्रिल रोजी होत आहे. तत्पूर्वी वाई येथील 40 धारकऱ्यांनी वढू बुद्रुक येथील छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणापासून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली. मजल, दरमजल करत ही ज्वाला वाई शहरात पोहचली आहे. त्या ज्वालेचे स्वागत वाई शहरात करण्यात आले. ही ज्वाला लाखानगर येथील विठ्ठल मंदिरात तेवत ठेवण्यात आली आहे. दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी ब्राम्हणशाही चौकात छ. संभाजी महाराज यांच्याविषयी बापू लाड हे विवेचन करणार आहेत. त्यानंतर वाई शहरातून मुकपदयात्रा काढून समारोप करण्यात येणार आहे, असे धारकऱ्यांनी सांगितले.


